SugarCRM च्या माध्यमातून इमेल कॅम्पेन.

इमेल कॅम्पेन्स अतिशय परिणामकारक असतात आणि पत्रव्यवहाराचा हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. इमेल कॅम्पेनच्या माध्यमातून तुम्ही व्यावसायाची माहीती, उत्पादनाचा तपशील, इमेल कॅम्पेनच्या माध्यमातून तुम्ही व्यावसायाची माहीती, उत्पादनाचा तपशील, कॅटलॉग्ज पाठवू शकता.

ब-याचशा कंपन्यांकडे इमेल कॉन्टॅक्टची भली मोठी यादी असते. यांचा उपयोग सामान्यपणे, कंपनीच्या/संस्थेच्या ताज्या उपक्रमांची माहिती देणे आणि वेगवेगळ्या प्रकाराने संपर्क ठेवण्यासाठी केला जातो. इमेल कॅम्पेन्स अतिशय परिणामकारक असतात आणि पत्रव्यवहाराचा हा सर्वात स्वस्त पर्याय आहे.
इमेल कॅम्पेनच्या माध्यमातून तुम्ही,
1.  व्यावसायाची माहीती,
2.  उत्पादनाचा तपशील,
3.  कॅटलॉग्ज,
4.  डिस्काऊंटच्या योजना,
5.  स्पेशल ऑफर्स,
6.  न्यूज लेटर्स,
7.  स्पेशल प्रमोशनल पॅकेजेस,
8.  खरेदी विक्रीच्या ऑफर्स,
9.  कार्यक्रमाचे निमंत्रण,
8.  खास कारणानिमित्त बनविलेली ग्रीटिंग कार्ड्स
11. व्यक्तिगत स्वरूपाच्या इमेल्स, पाठवू शकता.
SugarCRMचा आम्ही उपयोग करून पाहिलेला आहे आणि हे अत्यंत उपयुक्त असल्याचा अनुभवही घेतला आहे. वापरकर्त्यांसाठी आमचा अनुभव आम्ही शेयर करू इच्छितो आणि यासाठी आमची काही निरिक्षणे आम्ही खाली देत आहोत.
1.        तुमच्या कॉन्टॅक्ट्सची Excel फाईल (CSV फॉरमॅट) तुम्ही थेट इम्पोर्ट करू शकता. एक्सेल शीटच्या एकाच कॉलममध्ये इमेलची यादी असणे आवश्यक आहे. नाव, कंपनीचे नाव अशी अन्य माहीती आवश्यक असेल तर ती सुद्धा SugarCRM मध्ये इम्पोर्ट करता येते.
2.        यासाठी आपण SugarCRM वर युजर अकौंट निर्माण करणे (लोकल सर्व्हरवर किंवा आपल्या स्वत:च्या पीसी वर) आणि युझर आयडी आणि पासवर्ड, STMP सर्व्हर तपशीलासारखी इमेल ऑथॉन्टीकेशनसाठी आवश्यक माहीती देणे आवश्यक आहे. याठिकाणी हे सुचविणे योग्य ठरेल की, आपल्या इमेल्स योग्य ठिकाणीच पोहोचत आहेत याची खात्री करण्यासाठी काही टेस्ट मेल्स आवश्य पाठवा.
3.        मेल्स पाठविण्यासाठीची वेळ निश्चित करा. पुर्वनियोजित दिनांक आणि वेळेवर मेल्स पाठविण्याचे नियोजन तुम्ही करू शकता. हे फिचर अतिशय उपयुक्त आहे. उदाहरणार्थ; नव वर्षाच्या शुभेच्छा 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता पाठविण्याचे शेड्यूल आपण देऊ शकता. दिलेल्या तारीख वेळेला जरी तुम्ही हजर नसला तरी मेल्स पाठविल्या जातात.
4.        काही प्रकरणांमध्‍ये तुम्हाला मेलिंग स्पीड सेट करण्याची आवश्यकता भासेल. जसे की तुम्ही 2 मेल्स प्रति मिनिट हा वेग सेट करू शकता. एकाच वेळी अनेक मेल्स पाठविण्यामुळे स्पॅम इश्श्यू निर्माण होऊ शकतो.
5.        आता, विषय, मजकूर असा तपशील भरा आणि सेंड बटनवर क्लिक करा.
6.        आपल्याला दिसेल की, किती मेल्स पा‍ठविल्या, किती फेल झाल्या आणि किती बाऊन्स झाल्या याची मा‍हीती SugarCRM तुम्हाला देते.
आम्ही एकाच वेळी 2000 मेल्स पाठविल्या आणि हे पाठविणे यशस्वी झाले.
तुमचे इमेल कॅम्पेन सेट करण्यासाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर आमच्या Fidel SugarCRM वेब पेजला किंवा FidelCRM वेबसाईटला भेट द्या. आम्ही fidelcrm@fidelcrm.com इथेही उपलब्ध आहोत.

For inquiries, Please Call or Email